PostImage

P10NEWS

July 25, 2024   

PostImage

POLICE BHARTI : गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2022-23 (प्रत्यक्ष भरती-2024) …


 


गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2022-23 (प्रत्यक्ष भरती-2024) लेखी परीक्षा संबंधीत सुचना


    28 जुलै रोजी गडचिरोली शहरातील 11 परिक्षा केंद्रावर होणार लेखी परिक्षा

 

गडचिरोली/25 :   गडचिरोली पोलीस दलातर्फे 912 पोलीस शिपाई पदासंबंधीत मैदानी परीक्षा ही दिनांक 21/06/2024 ते 13/07/2024 रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती.  मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक 28/07/2024 रोजीचे सकाळी 08.00 वा. आयोजीत करण्यात आलेली आहे.  यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी 10.30 ते 12.00 या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी 13.30 ते 15.00 वा. दरम्यान घेण्यात येणार आहे.  
  सदर पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील 1) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली, 2) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ), 3) प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली, 4) आदिवासी इंग्लीश मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली, 5) कारमेल हायस्कुल, धानोरा रोड गडचिरोली, 6) स्कुल ऑॅफ स्कॉलर, धानोरा रोड गडचिरोली, 7) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, 8) शिवाजी इंग्लीश अॅकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली, 9) शासकिय कृषी महाविदयालय, आयटिआय चौक गडचिरोली, 10) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली, 11) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली, अशा एकुण 11 केंद्रावर घेण्यात येणार आहे.  तसेच उमेदवारांनी आपआपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 08.00 वा. उपस्थित राहणे आवश्यक राहील.  
सदर पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तरी, सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र  https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या लेखी परिक्षेची तारिख तसेच जिल्हायातील पावसाची परिस्थिती लक्षात ठेऊन लेखी परिक्षेसाठी लागणा-­या अत्यावश्यक कागदपत्रानिशी परिक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे.  तसेच सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात येईल. सोबतच परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, उमेदवारांसाठी पेन व पॅड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. सोबतच पेपर क्र.01 व पेपर क्र.02 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा कक्षामध्ये कुणीही बॅग, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सोबत बाळगणार नाहीत व कोणताही गैरप्रकार करणार नाही.  उमेदवाराला सोबत फक्त ओळखपत्र व प्रवेशपत्र घेऊन जाण्याची मुभा राहील. कोणताही उमेदवार गैरप्रकार किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनीक साधनांचा वापर करतांना आढळुन आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी व तसेच उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये व कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र. 8806312100 यावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी केलेले आहे. 


PostImage

P10NEWS

July 14, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023 (प्रत्यक्ष भरती -2024) ची मैदानी …


   GROUND REPORT : गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023 
(प्रत्यक्ष भरती -2024) ची मैदानी चाचणी संपन्न

 

, गडचिरोली/:- गडचिरोली पोलीस दलामार्फत चालक पोलीस शिपाई भरती 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 10 जागांसाठी तसेच गडचिरोली पोलीस शिपाई भरती  2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 912 जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणी ही दिनांक 19/06/2024 सुरु होऊन आज दिनांक 13/07/2024 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदान येथे संपन्न झालेली आहे.  

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली चालक पोलीस शिपाईच्या 10 पदाकरिता 2258 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यापैकी 1561 पुरुष व 267 महिला उमेदवार शारिरीक चाचणी करीता हजर आले व त्यापैकी 1363 पुरुष व 176 महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली.  यासोबतच सदर उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी एम.आय.डी.सी. मैदानावर प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली (आरटीओ) यांच्या समक्ष पार पडली. तसेच पोलीस शिपाईच्या 912 पदाकरिता एकुण 24570 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 13342 पुरुष उमेदवार व 6400 महिला उमेदवार हजर आले व त्यापैकी 11826 पुरुष व 5308 महिला उमेदवार यांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली. 

सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात आली असून यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test  तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आले. तसेच उमेदवारांची 1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी. धावणे (महिला), 100 मी. धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणी करीता (RFID) Based Technology  चा वापर करण्यात आले. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology  चा वापर करण्यात आले. यासोबतच उमेदवारांना मैदानी चाचणी दरम्यान काही दुखापत झाल्यास तात्काळ उपचार होण्याकरीता मैदानातचं रुग्णालयाची सोय करण्यात आली. तसेच  इतर काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण मा. पोलीस अधीक्षक यांचे समक्ष प्रत्यक्षरित्या करण्यात आले. यासोबतच आज रोजी गडचिरोली जिल्ह्रातील सर्व पत्रकार बंधुना बोलावून त्यांना पोलीस भरती मैदानी शारिरीक चाचणीमध्ये वापरण्यात आलेल्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. 
तसेच मैदानी चाचणी दिलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणतालीकेची यादी व लेखीपरिक्षेकरीता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी तसेच लेखीपरिक्षेचा दिनांक लवकरच गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे असे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी सांगितले आहे.